“भेंडवळची घट मांडणी“
संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील भेंडवळची “घटमांडणी” चे भाकीत आज जाहीर करण्यात आले आहे तब्बल 350 वर्षाची या घट मांडणीला परंपरा आहे. वाघ महाराजांच्या वंशजाकडून ही घट मांडली केली जाते. त्यात राज्य, देश आणि जगातील वर्षभरातील परिस्थितीवर भाष्य केलं जातं. तसेच राज्यातील पीकपाणी, पाऊस यावरही या घट मांडणीत भाकीत वर्तवलं जातं. यंदाही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घट मांडणी करून भाकिते वर्तवण्यात आली आहेत. यंदाच्या भाकितानुसार यंदा पेरण्या उशिरा होणार आहेत. मात्र, यंदा पाऊस चांगला होणार आहे. एवढेच नव्हे तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तर यंदा पिके चांगली येण्याची भविष्यवाणीही वर्तवण्यात आली आहे. या अंदाजावरुन राज्यातील बहुतेक शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचे नियोजन करत असतात
कशी केली जाते भविष्यवाणी :-अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अठरा विविध प्रकारचे धान्याचा गोलाकार पद्धतीने मांडणी करण्यात आली. याच्या मधोमध एक खड्डा करून त्यामध्ये घागर ठेवण्यात येते. या घागरीवर पुरी, करंजी, पापड यासारखे विविध साहित्य ठेवण्यात येते . प्रत्येक साहित्य विविध घटकाचे प्रतीक मानली जातात आणि या मांडलेल्या घटात रात्रभरातून होणाऱ्या बदलांच्या आधारे दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हे संपूर्ण बदलाचे निरीक्षण करून पुढील वर्षभरातील पाऊस पाणी, पीक परिस्थिती सोबतच राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर भाकीत वर्तवलं जातं.
यंदाचं भाकीत :-
यावर्षी पिकांवर रोगराई राहिल
ज्वारी – सर्वसाधारण येईल, भावात तेजी राहणार.
तूर – मोघम, पीक चांगले येईल.
मूग – मोघम, सर्वसाधारण पीक येईल
उडीद – मोघम, सर्वसाधारण पीक येईल
तीळ – सर्वसाधारण पीक येईल, नासाडी होईल
बाजरी – पीक साधारण येईल, नासाडी होईल.
भादली – कमी अधिक पीक येईल, रोगराई वाढेल
साळी – चांगले येईल पीक, तेजी असणार
मठ – सर्वसाधारण पीक येईल. तेजी असणार
जवस – नासाडी होणार, तेजी राहणार, पीक चांगले येणार
लाख – तेजी राहणार, सर्वसाधारण पीक येईल
वाटाणा – मोघम, सर्वसाधारण पीक येईल
गहू – तेजी राहणार, पीक चांगले राहील
हरभरा – मोघम, काही ठिकाणी चांगले राहील, रोगाने नुकसान होण्याची शक्यता
करडी – पीक चांगले आहे
पावसाबाबत अंदाज:-
- जून महिन्यात कमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे पेरणी उशिरा होईल
- जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे.
- ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडणार असून, अतिवृष्टी देखील होईल
- सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल
- पण अवकाळी पाऊस भरपूर होणार असून, पिकांचे नुकसान होईल
खरीप मधील पाऊस कसा राहील:-
जून – कमी अधिक पाऊस येणार, पेरणी उशीर होऊ शकते
जुलै– पाऊस सर्वसाधारण राहील
ऑगस्ट – एकदम चांगला पाऊस येणार, अतिवृष्टीची शक्यता
सप्टेंबर – पाऊस कमी आहे, पण अवकाळी पाऊस पडणार