जैविक कुंपण बनवा आर्थिक उत्पन्न मिळवा

जैविक कुंपण

जैविक कुंपण हे शेतमालाची अथवा शेतीतील अवजारांची चोरी वाचविण्यासाठी, जनावरांचा उपद्रव व त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतीला करण्यात येणारे एक वनस्पतींचे कुंपण असते. यासाठी बहुतेकवेळी जलद वाढणाऱ्या, प्रतिकूल वातावरणातही तग धरणाऱ्या काटेरी वनस्पतींचा वापर करण्यात येतो. या वनस्पती अथवा झुडुपे ही जनावरांना खाण्यास निरुपयोगी असणे आवश्यक आहे.

अनेक भागांत वन्यजीवांचा उपद्रव शेतीला मोठ्या प्रमाणात होतो. शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसतो. रातोरात उत्पादन फस्त करण्याची क्षमता या वन्यजीवांमध्ये असते. शेतकरी त्यांच्या बंदोबस्तासाठी शासकीय यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा करतात. मात्र त्यावर कायमस्वरूपी तोडगा अद्याप निघालेला नाही.

काही भागात  हरिण, रानडुकरे, सांबर, माकडे आदींचा उपद्रव बऱ्याच भागात कमालीचा आहे. या जिवांना मारणे हा कायद्याने गुन्हा आहे. हे प्राणी पिके खातात, शिवाय नासधूसही  मोठ्या प्रमाणात  करतात. दिवसभर काम केल्यानंतर रात्रीसुद्धा शेतात राखणीला जावे लागते. एवढे करूनही पिकाचे पूर्ण संरक्षण होत नाही. शेतकऱ्यांवर हल्ले झाल्याच्याही घटना आहेत. आर्थिक अडचणीमुळे मोठ्या क्षेत्रावर तार कुंपण करण्याचा खर्चही पेलवणे शक्य नसते. तार कुंपणासाठीचा खर्च एकरी ४० हजारांपेक्षा अधिक आहे.  शिवाय क्षेत्र मोठे असल्यास तो लाखाच्या घरात जातो अधिक विचार व अभ्यास करता करवंद , घायपात, बांबू तसेच  निवडुंगाचे कुंपण उपयोगी ठरू शकते. रानावनात वर्षानुवर्षे दिसणारी काटेरी झाडे असून कुठलेही जनावर त्यास खात नाही. तीक्ष्ण काटे असल्याने वन्यजीव त्याच्या आसपासही जात नाहीत व त्यातून आर्थिक उत्पन्नही मिळवता येते. 

 
संजीव कुंपणाचे होणारे फायदे:-

-वन्यजीवांचा त्रास कमी होईल किंवा संपेल. 
-मृदासंवर्धनास मदत 
-थंडीच्या लाटेत पिकाचे नुकसान कमी 
-कीटकांचा त्रास कमी होतो .
-आर्थिक फायदेशीर ठरते. 
-येणार खर्च हा तुलनेत फारच कमी आहे. 

करवंद :- 
 

करवंदांची Carissa spinarum नावाची जी जात आहे ती जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये कुंपणासाठी आणि सुगंधी फुलांसाठी लावतात. हिच्या पानांमध्ये भरपूर टॅनिन असते. Carissaa carandas ही जात भारतात सर्वत्र उगवते.

हे मध्यम आकाराचे काटेरी झाड असते. पण चांगलाच फल्लर(झुडूपासारखे)वाढते. करवंदाचे झाड लवकर मोठे होत नाही. खूप हळूहळू वाढते. शेळ्या-बकऱ्या या झाडाचा पाला खात नाहीत. तसेच काटेरी झाड असल्याने कुंपण करण्याच्या कामी येते.

पावसाळ्यात फळे- करवंद लागतात . सुंदर दिसतात . करवंदाच्या फळांची भाजी,रायता(लोणचे)चटणी , मुरब्बा करतात. तसेच कच्चेपण खातात . काहीजण वरणात टाकतात . चटनीने तोंडात चव येते.करवंदे आंबट असतात

निवडुंग :-

निवडुंगाची तटबंदी करा :पहिल्या टप्प्यात छोट्या फांद्या लावाव्यात . कुठल्याही व्यवस्थापनाशिवाय झाडांची भरघोस वाढ होते. शेताला चहूबाजूंनी जणू तटबंदी तयार होते . झाडे १० ते १२ फूट उंच करावीत . प्रत्येक दोन झाडांमधील अंतर एक फूट ठेवावे . झाडांचा बुंधा मजबूत झाल्यावर,  कुठलाही प्राणी आत शेतात शिरण्याची हिंमत करीत नाही. परिणामी, पीक राखणदारीचे काम बंद होते.  कुंपणावर दोडका, कारले, वाल आदी वेलवर्गीय पिकांची लागवडही करता येते. व यातून आपल्याला आर्थिक उत्पन्न ही साधता येते. 

घायपात :-

शेतजमिनीच्या बांधावर लागवड केली जाणारी घायपात वनस्पती घायाळ म्हणूनही ओळखली जाते.  ही वनस्पती मूळची मेक्सिकोतील तसेच अमेरिकेच्या दक्षिणेकडील संयुक्त संस्थानांतील असून पंधराव्या शतकात पोर्तुगीज लोकांनी ही वनस्पती भारतात आणली. भारतात हिची लागवड कर्नाटक, तमिळनाडू, केरळ व महाराष्ट्र या राज्यांत मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यांचा रंग करडा हिरवा असून दोन्ही कडांवर व टोकांवर तीक्ष्ण व लहान काटे असतात. त्यामुळेच यांची कुंपणा साठी वापर केला जातो. 
वनस्पतीला प्रादेशिक हवामानानुसार दहा ते साठ वर्षांदरम्यान एकदाच फुलोरा येतो. फुलोऱ्याचा दांडा तळाशी १५ सेंमी. जाड असून ६ – १० मी. उंच असतो. फुलोऱ्यातील लहान कंदिकांपासून तसेच मूलक्षोडापासून येणाऱ्या अधश्चरांपासून नवीन वनस्पती तयार होतात. यापासून मोठ्या प्रमाणावर रोपांची निर्मिती होत  असते 

घायपाताची मोठी पाने शेतातील भाजीपाला बांधण्यासाठी वापरतात. पानांचा रस सारक, आर्तवजनक व रक्तपित्तनाशक आहे. मुळे स्वेदकारी व गरमीनाशक आहेत. दांड्यातील रसापासून साखर तयार करतात. रस्त्याच्या व लोहमार्गाच्या दुतर्फा, कुंपणासाठी तसेच उताराच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी ही वनस्पती लावतात. तिच्या पानांपासून उपयुक्त धागा (वाख) मिळतो. तो लांब, मजबूत व भरभरीत असून दोर व दोरखंड करण्यासाठी वापरतात. याखेरीज चटया, पायपुसणे, गालिचे, जाडेभरडे कापड, स्वस्त प्रतीचे ब्रश व खुर्चांच्या गाद्या तयार करण्यासाठी वाख वापरला जातो. याचा उपयोग आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी केला जातो. 

भारतात घायपाताच्या पाच प्रमुख जाती आढळतात :

(१) अगेव्ह अंगुस्तिफोलिया (ड्वार्फ ॲलो; छोटा घायाळ) ही मूळची उ. अमेरिकेतील असून भारतात हिमालयाच्या खालच्या भागात आढळते.

(२) अगेव्ह कॅटाला (बाँबेरेला) ही जात भारतात सर्वात आधी आली आहे असे मानतात. ही मूळची मध्य-अमेरिकेतील असून भारतात सर्वत्र वाढते.

(३) अगेव्ह सिसालाना (सिसाल; वनकेवडा) ही मूळची मध्य-अमेरिकेतील असून भारतात पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांत लागवडीखाली आहे.

(४) अगेव्ह व्हेराक्रुझ (ब्लू एलिफ़ंट ॲलो; ललि घायाळ) ही मूळची मेक्सिकोतील असून भारतात सर्वत्र कुंपणासाठी लावलेली आढळते.

(५) अगेव्ह अमेरिकना (अमेरिकन ॲलो) या जातीची भारतात फक्त बागांमध्ये शोभेचे झाड म्हणून लागवड करतात.

Leave a Comment

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!