कृषि पर्यटन सुरू करायचे आहे? , तर मग या गोष्टी लक्षात ठेवा.

“कृषि पर्यटन”

शासनाने दिनांक 4 मे 2016 रोजी नवे “कृषि पर्यटन धोरण” जाहीर केले व 6 सप्टेंबेर 2020 रोजीच्या निर्णयानुसार ” कृषि पर्यटन धोरणास “मान्यता दिली 

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुकूटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, मत्स्य व्यवसाय इत्यादी कृषी संलग्न विषयाचा एकत्रित विचार केल्यास ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटनाला निश्चितपणे चालना मिळू शकते. राज्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे आणि शहरी पर्यटकांना शांत, निसर्ग संपन्न ठिकाण राहून पर्यटनाचा आनंद मिळावा यासाठी एक सुनियोजित व्यवस्था निर्माण करून पर्यटन विकास साध्य करणे हे कृषी पर्यटन धोरणाचे महत्त्वाचा उद्देश आहे

कृषी पर्यटनाचा उद्देश :

  • कृषी पर्यटनाला कृषी पूरक व्यवसाय म्हणून प्रोत्साहन देणे. 
  • कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास साधणे. 
  • ग्रामीण भागातील लोककला व परंपरा यांचे दर्शन घडवणे. 
  • ग्रामीण महिला व तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. 
  • शेती पद्धती तसेच कृषी संलग्न व्यवसायाची माहिती उपलब्ध करून देणे. 
  • पर्यटकांना प्रदूषण मुक्त शांत व निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव देणे. 
  • पर्यटकांना प्रत्यक्ष शेतीतील कामाचा अनुभव देणे. 
  • ग्रामीण भागातील पडीक गायरान आणि क्षारपड जमिनी उपयोगात आणणे. 

कृषी पर्यटन केंद्रासाठी कोणते घटक पात्र आहेत :

  • वैयक्तिक शेतकरी.
  • शेतकऱ्यांच्या कृषी सहकारी संस्था.
  • शासन मान्यता प्राप्त कृषी विज्ञान केंद्र.
  • कृषी महाविद्यालय (खाजगी व शासकीय).
  • कृषी विद्यापीठे.
  • शेतकऱ्यांनी स्थापन केलेली भागीदारी संस्था किंवा कंपनी.

कृषी पर्यटनासाठी बंधनकारक असणाऱ्या बाबी :

  • शेती हा प्रमुख व्यवसाय तर पर्यटन हा पूरक व्यवसाय असावा.
  • कृषी पर्यटन केंद्र हे शहराच्या हद्दीपासून किमान १  किलोमीटर बाहेर खेडेगावामध्येअसावे.
  • शेती क्षेत्र कृषी पर्यटन सुरू करण्यासाठी कमीत कमी १ एकर क्षेत्र असावे, शालेय सहली आयोजित करण्यात येणार असतील तर त्या ठिकाणी कमीत कमी ५ एकर क्षेत्र असावे.
  • वैयक्तिक शेतकरी असल्यास तो स्वतः शेती करणारा असावा तसेच त्याच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावे ७/१२ उतारा असणे आवश्यक आहे.

आदर्श पर्यटन केंद्र करता ऐच्छिक बाबी :

  • पर्यटन केंद्र हे शांत सुंदर निसर्गरम्य अशा ठिकाणी असावे.
  • पर्यटन केंद्रावर घरगुती पद्धतीच्या रुचकर आणि शक्यतो महाराष्ट्रीयन भोजनाची व्यवस्था असावी.
  • पर्यटन केंद्राच्या ठिकाणी विविध पीक पद्धतीचा अवलंब करावा.  उदा-अन्नधान्य, भाजीपाला ,फळबाग, फुल रोपवाटिका इत्यादी.
  • ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी बैलगाडी, घोडागाडी, घोडेस्वारी शेतीवरील विविध हंगामातील कामे दाखवण्याची सोय करावी.
  • पर्यटन केंद्रावर ग्रामीण खेळ असावेत, उदा- विटी दांडू, हुतुतू, लंगडी, झोका, लगोरी.
  • पर्यटन केंद्रावर ग्रामीण व पारंपारिक मनोरंजन कार्यक्रमाची व्यवस्था करावी. उदा-पोवाडा,गोंधळ,जागरण लेझीम,भजन,कीर्तन,आदिवासी नृत्य इत्यादी.
  • पर्यटन केंद्राच्या परिसरात किल्ला, गिर्यारोहण, तलाव, नदी इत्यादी निसर्गरम्य ठिकाणे असल्यास पर्यटकांना मार्गदर्शन करावे.
  • कृषी पर्यटन केंद्राने शेतीमधील ताजा भाजीपाला, फळे, अन्नधान्य इत्यादी माल पर्यटकांना विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावा.
  • कृषी पर्यटन केंद्रा  मार्फत दिशादर्शक फलक लावणे आवश्यक आहे.
  • कृषी क्षेत्र जर कमी असल्यास आसपासच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कृषी संबंधित बाबी संबंधी शेतकऱ्यांच्या संमतीने पर्यटकांना दाखवता येईल.
  • पर्यटन केंद्राच्या ठिकाणी स्थानिक कला, संस्कृती दाखवण्यासाठी साहित्य उपलब्ध करून द्यावे.

कृषी पर्यटन केंद्रामार्फत पर्यटकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवा सुविधा :

  • एक दिवशीय सहल.
  • निवास व्यवस्था.
  • मनोरंजनात्मक सेवा उदा-मुलांना खेळण्यासाठी जागा,  साहसी खेळ, ग्रामीण खेळ.
  • कृषी कॅम्पिंग.
  • फळबागा व पदार्थ विक्री केंद्र.

निवास व्यवस्था :

अ क्र  शेती क्षेत्र  खोल्यांची संख्या  खोल्यांचे आकारमान 
१   २ एकर पर्यन्त  ४ (कमाल) १५० चौ.मी.  किमान 
२  २ एकर ते ५ एकर  ६ (कमाल) १५० चौ.मी.  किमान 
३  ५ एकर पेक्षा जास्त  ८ खोल्या व
२ मोठे लोकनिवास 

१५० चौ.मी.  किमान 

लोकनिवासचे ७००-८०० चौ.मी किमान 

 

  • कृषी पर्यटन केंद्र चालवण्यासाठी पर्यटन विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र घेणे तसेच इतर सर्व विभागाच्या परवानगी घेणे बंधनकारक राहील.
  • वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी फर्स्ट एड बॉक्स पर्यटन केंद्र ठिकाणी ठेवावे.
  • अग्निशामक यंत्र बसवणे आवश्यक राहील.
  • पर्यटन केंद्राच्या ठिकाणी येण्याचा रस्ता हा व्यवस्थित असावा तसेच पर्यटकांच्या वाहनासाठी वाहन तळाची व्यवस्था आवश्यक आहे.

कृषी अंतर्गत शेती सोबत इतरही उपक्रम राबवता येतील :

  • हरितगृह
  • दुग्ध व्यवसाय
  • मत्स्य व्यवसाय
  • रोपवाटिका, फळबाग
  • पशु-पक्षी पालन, कुकुटपालन, शेळी-मेंढी पालन
  • निसर्ग साहसी पर्यटन त्याकरता स्वतंत्र परवानगी घ्यावी लागते
  • वाईन टुरिझम

कृषी पर्यटन केंद्र शासनाकडून मिळणारे लाभ :

  • पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळेल
  • नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे बँक कर्ज प्राप्त करता येते
  • वस्तू व सेवा कर, विद्युत शुल्क यामध्ये सवलत घेता येईल
  • पर्यटन केंद्रामध्ये न्याहरी योजनेच्या धर्तीवर घरगुती गॅस जोडणी वापरता येईल
  •  कृषी पर्यटन केंद्र चालकांना अनुभवी प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल
  • नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्राची पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल

अर्ज करण्याची कार्यपद्धती :

 https://www.maharashtratourism.gov.in/web/mh-tourism/agro-tourism-registration 

वरील संकेतस्थळावर कृषि पर्यटन नोंदणी साठीचा अर्ज करता येईल. 

आवश्यक कागदपत्रे :

  • अर्जदाराची जमिनीची कागदपत्रे ( ७/१२ उतारा, ८अ उतारा ).
  • आधार कार्ड, पॅन कार्ड.
  • विज बिल.
  • नोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने  https://gras.mahakosh.gov.in/echallan/ या वेबसाईटवर भरून चलनाची प्रत जोडावी.
  • फूड लायसन.
  • लोकनिवास बांधकाम असल्यास परवानगी चे प्रमाणपत्र.

नोंदणी शुल्क :

कृषी पर्यटनाकरता प्रथम नोंदणीसाठी 2500 शुल्क तर पाच वर्षांनी नूतनीकरण शुल्क 1000 रुपये भरावे लागेल.

Leave a Comment

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!