राज्यात मार्च महिन्यां नंतर आता एप्रिल महिन्यातही अवकळी पावसाने हैराण केले आहे ,
कमाल तापमानाचा पारा वाढत असल्याने उन्हाचा चटका तापदायक होत आहे. वादळी पावसासह गारपीट दणका कायम आहे.
उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Update) दिला आहे.
कमाल तापमानात वाढ होत असून, उन्हाच्या झळा असह्य ठरत आहेत. राज्यात उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
तर ब्रह्मपूरी, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, जळगाव, धुळे येथे तापमान ४१ अंशांवर होते. उर्वरीत राज्यात कमाल तापमान ३४ ते ४० अंशांच्या दरम्यान असून, उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.
उत्तर अंतर्गत कर्नाटक पासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, खंडीत वारे वाहत आहेत.
आज उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : पालघर.
मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
मराठवाडा : धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली.
सौजन्य :