फक्त १ रु. पीक विमा योजना

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची गोष्ट – ती म्हणजे शेतकऱ्यांना आता फक्त १ रुपया मध्ये मिळणार पीक विमा 

नक्की काय आहे १ रुपया मध्ये मिळणारी पीक विमा योजना आणि त्यासाठी काय कागदपत्रे लागणार आहे कोण कोणत्या पिकांसाठी या योजनेचा लाभ घेण्यात येईल , सर्वात महत्वाचं म्हणजे या विम्याचा हफ्ता कधी व कोठे आणि कधीपासून भरता येईल इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

शेतक-यांना केवळ रु.१/- भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याबाबतच्या प्रस्तावास दि. ३०.०५.२०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. ही योजना खरीप व रब्बी हंगाम 2023-24 ते 2025-26  या  तीन वर्षाच्या  कालावधीसाठी निविदा प्रक्रीयेने राबविण्यात येईल ,विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे नफा आणि तोटा शेअरींग मॉडेल किंवा कप अँड कॅप मॉडेल (80:110) नुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने उचित पर्यायासह राबविण्यात येईल. 

राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांत पिक विमा काढता येईल व याची उर्वरित रक्कम आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये केली.

“1 रुपयात पीक विमा योजना” ह्या योजनेचा हेतू :-  राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे  मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी हा या योजनेमागचा हेतू आहे.

योजनेची वैशिष्ट्य :-

कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात. नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा उद्देश आहे. पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना अधिसूचीत केलेल्या पिकांसाठी व केवळ अधिसूचित क्षेत्रा साठी असेल यातील जोखीम स्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे.

जोखमीच्या बाबी:- 

  • पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे नुकसान
  • पिकाच्या हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जसे की, पूर, दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळ इत्यादीमुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास.
  • पीक काढणीनंतर नुकसान झाल्यास पंचनामा करुन नुकसान भरपाईस पात्र जसे की भात पेंढया सुकवणीस ठेवल्यास त्या बिगर मौसमी पावसाने होणारे नुकसान.  
  • स्थानिक नैसर्गिक आपत्ति मुळे होणारे नुकसान जसे की गारपीट, ढगफूटी,

योजनेत समाविष्ट पिके :- 

या मध्ये अन्न धान्य पिके, गळीत धान्य पिके,व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल 

योजनेचे वेळापत्रक:- 

पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ( खरीप हंगाम ) अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2023

पिक विमा योजनेत सहभागा साठी लागणारी कागद पत्रे :- ज्या क्षेत्रावरील पिकाचा विमा काढावयाचा आहे त्या शेत जमिनीचा 7/12 व  8 अ, स्वयंघोषणापत्र, आधार कार्ड , बँक खाते क्रमांक ई. 

ई पीक पाहणी :-

  • शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी अंतेर्गत आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी.
  • विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक यात तफावत आढळल्यास, ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल. 

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी काय कराल : 

  1. ज्या बँकेत किसान क्रेडिट कार्ड खाते आहे किंवा ज्या बँकेकडून पीक कर्ज घेतले आहे त्या बँक शाखेत योजनेत सहभागी होणार असल्याचे घोषणा पत्र जमा करावे व त्याची पोहोच पावती प्राप्त करून घ्यावी.
  2. योजनेत इछुक बिगर कर्जदार शेतकरी हे विमा प्रस्तावाचे अर्ज भरून व्यापारी बँक/ प्रादेशिक ग्रामीण बँक/ प्राथमिक कृषि पत पुरवठा सहकारी संस्था / आपले सरकार सेवा केंद्र (CSC) / अधिकृत विमा प्रतीनिधी यांच्या कडे रकमेसह सादर करतील.

https://pmfby.gov.in/farmerRegistrationForm

                                         

वरील लिंक वर क्लिक करून आपण स्वताः अर्ज करू शकता 

पीक पेरा स्वयं घोषणापत्र

वरील लिंक वर क्लिक करून पिक पेरा स्वयं घोषणापत्र डाउनलोड करा  

पीक विमा योजना अर्ज/घोषणापत्र  

वरील लिंक वर क्लिक करून प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी चे घोषणापत्र /अर्ज डाउनलोड करा 

Leave a Comment

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!