PM KISAN योजनेचे नवे नियम , पुढील हप्ता मिळण्यासाठी करा हे काम

पीएम किसान योजना :-

कोरोना महामारीच्या काळात शेती क्षेत्राने व शेतकरी बांधवांनी सर्वांना दाखवून दिले की देशाचीच नाही तर इतर देशांनाही अन्नपुरवठा करण्यास सक्षम आहे, शेतकऱ्यांसाठी सरकार नेहमीच पुढाकार घेऊन नवनवीन फायदेशीर योजना अमलात आणत असते

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सम्मान निधी  अंतर्गत देशातील 8 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात DBT च्या माध्यमातून रक्कम वितरीत केली. सोमवारी पीएम किसान योजनेच्या 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,000 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जमा करण्यात आली. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 2,000 रुपयांचा निधी तीन समान हप्त्यात देण्यात येतो. शेतकऱ्याच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये जमा करण्यात येतात. 

वर्ष 2019 मध्ये मोदी सरकारने पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना सुरु केली. देशभरातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या समान तीन हप्त्यात ही रक्कम वितरीत करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेत आतापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय देण्यात आले आहे. 2.25 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम छोट्या आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये अनुदान दिले जाते या योजनेअंतर्गत प्रत्येकी दोन हजार रुपये तेरा समान हफ्त्यांमध्ये जमा  करण्यात आले आहेत लवकरच १४ वा हप्ता जमा होईल परंतु बरेच शेतकऱ्यांना सन्मान निधीचे हप्ते मिळण्यात अडचण निर्माण होत आहे त्या लाभार्थ्यास योजनेचे नियम व अटी माहीत असणे आवश्यक आहे

१ ) E-Kyc करणे

२ ) आधार शेडिंग करणे. 

जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल व हप्ता जमा होत नसल्यास पीएम किसान पोर्टल  वर तसेच आपले खाते असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत ई  केवायसी करून घ्यावी

इ -केवायसी कशी कराल:-

https://pmkisan.gov.in/  या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

 -ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा

-आधार क्रमांक व नोंदणीकृत मोबाईल क्रमांक एंटर करा

अशाप्रकारे तुमचे केवायसी होईल

 

आपला दर्जा (Status)  तपासण्यासाठी हे करा

https://pmkisan.gov.in/  या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

-लाभार्थी स्थिती या पर्यायावर पर्यायावर क्लिक करा

-शेतकऱ्याने रजिस्टर केलेला मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकून सबमिट करा

-आपले स्टेटस आपल्याला दिसेल.

 

कृषी मंत्रालयाचे हेल्पलाईन क्रमांक:-

  1. पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
  2. पीएम किसान हेल्पलाईन क्रमांक :155261
  3. पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011—23381092, 23382401
  4. पीएम किसान नवीन हेल्पलाइन : 011-24300606
  5. पीएम किसान अजून एक हेल्पलाइन क्रमांक : 0120-6025109

Leave a Comment

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!