प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) , ३५ % अनुदान. कसा मिळेल लाभ ?

 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ( PMFME )

आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत कृषी विभागाची एक महत्त्वाकांशी योजना

केंद्र शासन सहाय्यित

समाविष्ट जिल्हे:- महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्हे ( मुंबई शहर व मुंबई उपनगर समाविष्ट)

  • सध्या कार्यरत असलेल्या व नवीन सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि नवे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करणे
  • सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षांसाठी संपूर्ण राज्यभर लागू आहे. 
  • सर्व प्रकारच्या नवीन व कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँकेच्या कर्जाशी निगडित असा लाभ मिळतो.
  • आजारी सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगही बँक कर्ज उपलब्ध असल्यास पात्र ठरतात
  • पारंपारिक स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन
  • वैयक्तिक लाभार्थी—प्रगतशील शेतकरी , नव उद्योजक , बेरोजगार युवक , महिला वैयक्तिक मालकी/भागीदारी ,शेतकरी उत्पादक संस्था (FPO), स्वयंसहायता गट (SHG) , गैर सहकारी संस्था (NGO) ,सहकारी संस्था, खाजगी कंपनी इत्यादी.
  • गट लाभार्थी /CIF – शेतकरी उत्पादक संस्था (FPO) / शेतकरी उत्पादक कंपनी (FPC), सहकारी संस्था , स्वयंसहायता गट ( (SHG) 
  • ODOP किंवा  NON ODPO साठीचे प्रस्ताव सहाय्यासाठी पात्र तथापि ODOP प्रस्तावांना प्राधान्य. 
  • या योजनेमध्ये नाशवंत फळ पिके, कोरडवाहू पिके, भाजीपाला, अन्नधान्य, तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, मसाला पिके, गुळ इत्यादींवर आधारित उत्पादने, दूध व पशु उत्पादने, सागरी उत्पादने, मांस उत्पादने , वन उत्पादने इत्यादी उत्पादनांचा समावेश. 
  • योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन संगणकासोबतच मोबाईल वरून देखील अर्ज सादर करता येईल. 
  • एकाच लाभार्थ्याला योजनेअंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल. 

 

योजनेअंतर्गत घटक लाभार्थी आणि आर्थिक मापदंड

१ ) प्रशिक्षण- * योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीने कर्ज मंजुरीसाठी बँकेकडे शिफारस केलेले वैयक्तिक लाभार्थी (३ दिवस प्रशिक्षण)

                     * योजनेअंतर्गत बीज भांडवल लाभ मिळालेले स्वयंसहायता गटाचे लाभार्थी ( १ दिवस प्रशिक्षण)

                     * प्रशिक्षणाचे अनुदान शंभर टक्के

२ ) बीज भांडवल- ग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयंसहायता गटातील सदस्य गट यांना लहान मशनरी खरेदी          करण्यासाठी व खेळते भांडवल यासाठी प्रति सदस्य कमाल रुपये ४०,०००/-  व प्रति स्वयंसहायता गट कमाल रक्कम ४,००,०००/-

३ ) वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग- वैयक्तिक मालकी / भागीदारी ,शेतकरी उत्पादक संस्था (FPO),  अशासकीय संस्था सहकारी संस्था (NGO),  खाजगी कंपनी , स्वयंसाहायता गट (SHG) यांना प्रकल्प किमतीच्या 35 टक्के , जास्तीत जास्त १० लाख रुपये

४ ) सूक्ष्म अन्नप्रक्रिया गट उद्योगांना लाभ (सामायिक पायाभूत सुविधा)—शेतकरी उत्पादक संस्था (FPO)/शेतकरी उत्पादक कंपनी (FPC), सहकारी संस्था , स्वयं सहाय्यक गट (SHG), आणि त्यांचे फेडरेशन यांना प्रकल्प किमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त तीन कोटी पर्यंत मदत

५ ) मार्केटिंग व ब्रँडिंग – शेतकरी उत्पादक संस्था (FPO)/शेतकरी उत्पादक कंपनी (FPC),  स्वयंसहायता गट(SHG) यांचे समूह अथवा SPV यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या 50% कमाल आर्थिक मर्यादा केंद्रशासमार्फत नंतर विहित करण्यात येईल

६ ) सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना लाभ (इनक्युबॅशन केंद्र /मूल्यसाखळी) – शेतकरी उत्पादक संस्था (FPO)/शेतकरी उत्पादक कंपनी (FPC), सहकारी संस्था , स्वयं सहाय्यक गट (SHG) यांना त्यांच्या प्रकल्प किमतीच्या 35 टक्के ते जास्तीत जास्त ३ कोटी. 

 

 

सर्व सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना लाभ तथापि ODOP ना प्राधान्य

फळे उत्पादने-

पालघर ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग, धुळे ,जळगाव ,सांगली ,जालना ,बीड, अमरावती ,बुलढाणा.

भाजीपाला उत्पादने-

 नाशिक, पुणे, लातूर.

मासे व सागरी उत्पादने

मुंबई शहर ,मुंबई उपनगर, रायगड.

पौष्टिक तृणधान्य उत्पादने

ठाणे, नंदुरबार, सोलापूर.

तृणधान्य उत्पादने

छत्रपती संभाजीनगर, भंडारा ,गोंदिया ,चंद्रपूर.

कडधान्य उत्पादने

धाराशिव, अकोला.

तेलबिया उत्पादने-

वाशिम.

मसाला उत्पादने-

नांदेड ,हिंगोली ,यवतमाळ, वर्धा.

ऊस गुळ उत्पादने

कोल्हापूर, सातारा, परभणी.

दूध व दुग्धजन्य पदार्थ-

अहमदनगर

किरकोळ वन उत्पादने-

गडचिरोली

 

लाभार्थी निवडीचे निकष

१ ) वैयक्तिक लाभार्थी निवड निकष

  • अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार असावा. 
  • अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष व एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल. 
  • सदर उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करून देण्याची तयारी असावी. 
  • प्रकल्प किमतीच्या किमान १०% लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक कर्ज घेण्याची तयारी असावी. 

२ ) गट लाभार्थी निवडीचे निकष

  • सर्व अन्नप्रक्रिया उद्योगांच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत शेतकरी उत्पादक गट / कंपनी ,स्वयंसहायता गट ,उत्पादक सहकारी संस्थांना लाभ देय असेल
  • प्रकल्प किमतीच्या किमान १०%  लाभार्थी  हिस्सा व उर्वरित बँक कर्ज घेण्याची तयारी असावी

 

अर्ज करण्यासाठीचे संकेत स्थळ :- https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/Login

                                                      https://krishi.maharashtra.gov.in/

 

अर्ज करण्याची पद्धत:-

 

Leave a Comment

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!