कुसुम सौर पंप योजना

“कुसुम सोलर पंप योजना”

महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत राज्यातील कृषी पंप विज जोडण्याची सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम-ब योजना 90 ते 95 टक्के अनुदानाची………. पर्यावरण पूरक हरित क्रांतीची!

कुसुम सोलर पंप योजना याचा मुख्य उद्देश म्हणजेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर उर्जेवर चालणाऱ्या मोटारीचा फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी शेतीतील पिकासाठी पाणी देता यावे. केंद्र सरकार व राज्य शासनामार्फत पेट्रोल व डिझेलवर चालणारी इंजिन ही अनुदानात मिळत आहेत परंतु आता त्याचे रूपांतर हे सौरऊर्जेवर चालणाऱ्या सौर पंपामध्ये होत आहे. 

 

योजनेची वैशिष्ट्ये:

  • 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये स्थापना करणे,  शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार.
  • शेतकऱ्यांच्या शेतीक्षेत्र धारण क्षमतेनुसार 3 HP,  5 HP , 7.5 HP व त्यापेक्षा जास्त HP DC सौर पंप उपलब्ध होणार.
  • सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे कृषी पंप किमतीच्या 10% तर अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5 % लाभार्थी हिस्सा भरावा लागेल.
  • स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येतील.

 

लाभार्थी निवडीचे ठळक निकष:

  • पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
  • शेततळे , विहीर  , बोरवेल ,बारमाई वाहणारी नदी /नाले यांच्या शेजारील तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
  • अटल सौर कृषी पंप योजना टप्पा एक व दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केलेले परंतु मंजूर न झालेले अर्जदार.
  • 2.5 एकर जमीन धारकास 3 HP, 5  एकर शेत जमीनधारक शेतकऱ्यास 5 HP, त्यापेक्षा जास्त शेतजमीनधारकांसाठी 7.5 HP क्षमतेचे सौर पंप उपलब्ध.

 

महा कृषी ऊर्जा अभियान (कुसुम) आवश्यक कागदपत्रे:

  • सातबारा उतारा (विहीर/कुपनलिका शेतात असल्यास सातबारा उताऱ्यावर नोंद आवश्यक) एका पेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादारांचे ना हरकत प्रमाणपत्र रुपये दोनशे च्या मुद्रांक कागदावर सादर करावे. 
  • आधार कार्ड प्रत.
  • बँक पासबुक प्रत.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • शेत जमीन / विहीर / पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदारांचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.

 

ऑनलाईन नोंदणीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्यावी :

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B 

 

कुसुम सोलर पंप योजना अर्ज करण्यासाठीची  माहिती पुस्तिका:

kusumlabharthi येथे क्लिक करा 

 

कुसुम योजनेविषयी सतत विचारले जाणारे प्रश्न:

solar FAQ    येथे क्लिक करा

Leave a Comment

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!