शेतकरी बांधवांसाठी खुशखबर महाडीबीटी च्या अनुदानात वाढ

mahadbt

महाडीबीटी च्या “कृषि यांत्रिकीकरण उप अभियान ( S H A M )” अंतर्गत अनुदानात वाढ. 

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बाब समोर आलेली आहे. “MahaDBT Farmer Portal” च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवाना विविध योजनांचा लाभ मिळवून देत आहे.

MahaDBT Farmer Portal हे महाराष्ट्र शासनाचे एक अत्यंत महत्वाचे पोर्टल असनू,  शेतकऱ्यांना योजनांच्या माध्यमातनू थेट लाभ मिळवुन देण्यासाठी विकसित केलेलं एक व्यासपीठ आहे.

Mahadbt Farmer अंतर्गत येणाऱ्या योजनांची माहिती व लाभ मिळण्यासाठी सर्वप्रथम Mahadbt Farmer Registration करून घ्यावे लागेल.

महाडीबीटी फार्मर पोर्टल वरती उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या “नवीन अर्जदार नोंदणी” या बटनावर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया सुरु करा.

योजनेचे नाव

MAHADBT Scheme
अधिकृत संकेतस्थळ “https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login”
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन

 

शेतकरी बांधवांसाठी कृषी विभागाच्या सर्व योजना या महाडीबीटी पोर्टलवर चालू आहेत जसे की

  1. कृषी यांत्रिकीकरण
  2. सिंचन साधने व सुविधा
  3. बियाणे औषधे व खते
  4. फलोत्पादन
  5. छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना( मागेल त्याला अंतर्गत घटक)

महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज स्वीकारून त्यातून ऑनलाइन सोडत काढली जाते.  महाडीबीटी पोर्टल वरील कृषी यांत्रिकीकरण सोडती मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र,पावर टिलर इत्यादी  तसेच इतर अवजारांसाठी लाभार्थी निवड करून लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान वितरित केले जाते.
महाडीबीटी पोर्टल वर निवड झालेल्या लाभार्थ्यांनी आपला 7/12,  8 अ , निवडलेल्या यंत्राचे कोटेशन यंत्राचा टेस्ट रिपोर्ट हे अपलोड केले जाते त्यानंतर त्यांना पूर्वसंमती दिली जाऊन अवजार खरेदी नंतर अनुदान वाटप केले जाते.

महाडीबीटी द्वारा दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रकमेत मोठे बदल केलेले असून भरघोस वाढ करण्यात आलेली आहे.

केंद्र शासनाचे दिनांक 27 ऑक्टोबर 2023 च्या पत्रानुसार कृषी यांत्रिकीकरन उप अभियान ( S H A M ) योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र असलेल्या कृषी अवजारे यांची सुधारित एकत्रित यादी व अवजारांची मंजूर कमाल अनुदान मर्यादा घातलेली असून केंद्र शासनाच्या ” https://farmech.gov.in/ ” या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. 

कृषी यांत्रिकीकरण घटकांनुसार ट्रॅक्टर या बाबी करता   4 W D ( Above 40 PTO HP ) अनुदान मर्यादा 1.25 लाख वरून आता 5 लाख खरेदी किंमतीच्या 50 %  मर्यादित मंजूर केलेले आहे. पवार टिलर (above 11 HP ) अनुदान मर्यादा 85 हजार वरुण आता 1.20 लाख खरेदी किमतीच्या 50 % मर्यादेत मंजूर केलेले आहे.

अनुदान बाबतचे परिपत्रक

mahadbt GR

अनुदान मर्यादेत पुढील प्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे

             ↓

“Final SMAM cost norms 2023-24”

Leave a Comment

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!