आंबा पिकामध्ये नियमित व लवकर मोहोर येण्यासाठी काय कराल

आंब्या मध्ये नियमित व लवकर मोहोर येण्यासाठी पॅक्लोब्युट्राझोल (कल्टार) चा वापर 

आंबा हे बहुवार्षिक फळपीक असून लागवडीनंतर चाळीस किंवा त्याहून अधिक वर्षापर्यंत उत्पादन देते महाराष्ट्रातील लागवडी खाली प्रमुख आंबा जातींमध्ये वर्ष-आड फळधारणा आढळते. हापूस ,केसर ,लंगडा व पायरी या जातीमध्ये वर्षाआड फळधारणा हा अनुवंशिक गुणधर्म असून त्याच प्रमुख मागणी असलेल्या आंब्याच्या जाती आहेत.

आंब्यामध्ये मोहोर निर्मिती क्रिया गुंतागुंतीचे असते मोहर निर्मितीसाठी फांदीची पक्वता ,कार्बोदके, नत्र त्यांचे प्रमाण अन्न घटकांची वेळेवर उपलब्धता विविध अंतर्गत संजीवकांची ठराविक पातळी आणि विशिष्ट हवामान या गोष्टी आवश्यक असतात.

परंतु वरील सर्व बाबी अनुकूल असूनही वर्ष आड फळधारणा या अनुवंशिक गुणधर्मामुळे आंब्याच्या उत्पादनात अनियमितता आढळते. आंबा काडीच्या  पक्वतेवर मोहर येण्याचा  कालावधी अवलंबून असतो. आंब्या मध्ये सूक्ष्म मोहोर  निर्मितीची क्रिया ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यात (flower bud diffrentiation) होते आणि डिसेंबर- जानेवारीमध्ये मोहर येतो.  स्थानिक हवामानानुसार यामध्ये दोन्ही अवस्थांच्या काळ कमी जास्त होतो

आंब्याच्या मोहर निर्मिती कार्यामध्ये अंतर्गत संजीवकांची पातळी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते दरवर्षी मोहोर येणाऱ्या नीलम, तोतापुरी यासारख्या आंबा जातीमध्ये वाढ वृद्धी व वाढ निरोधक संजीवकाचे प्रमाण दर वर्षी सुयोग राखले जाते, आंबा फळझाडांमध्ये वाढ उत्तेजक व वाढ निरोधक यामध्ये आवश्यक समन्वय साधला जात नाही तोपर्यंत सूक्ष्म अवस्थेतील बहराची निर्मिती होत नाही.

ज्या आंब्याच्या जातीमध्ये वर्षा आड फलधारणा होते त्यामध्ये जिब्रेलिन सारखे संजीवकाचे प्रमाण फारच जास्तीचे असते व शाकीय वाढ जास्त होते मात्र फुलधारणा होत नाही म्हणूनच इतर फळझाडांप्रमाणे आंब्यामध्ये जिब्रेलिग सारख्या वाढ वृद्धी संजीविकाच्या निर्मिती क्रियेमध्ये बाधा घालण्यासाठी  पॅक्लोब्युट्राझोल हे पीक वाढ निरोधक योग्य वेळी योग्य मात्रेत व योग्य पद्धतीने वापरल्यास दरवर्षी फळांचे उत्पादन घेणे शक्य होईल.

पॅक्लोब्युट्राझोल मात्रा व झाडाची निवड:

विद्यापीठाने आंबा झाडांच्या विस्तारानुसार पॅक्लोब्युट्राझोल या संजीविकाची मात्रा योग्य वेळी व योग्य पद्धतीने देण्याविषयी शिफारस केलेली आहे. प्रथम झाडाचा पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर पसरण्याचा व्यास मीटर मध्ये मोजून घ्यावा मोजून घ्यावा त्यानंतर सरासरी प्रति मीटर 3.25 मिली संजीवक द्यावे

पॅक्लोब्युट्राझोल देण्यासाठी निरोगी व जोमदार झाडे निवडावी अशक्त झाडांना  देऊ नये

पॅक्लोब्युट्राझोल देण्याची पद्धत

  • पॅक्लोब्युट्राझोल चा वापर करण्यासाठी झाडाची सरासरी व्यास काढावा
  • झाडाचा व्यास मोजून हे संजीवक देताना तीन ते सहा लिटर पाण्यात त्याचे द्रावण तयार करावे
  • झाडांच्या भोवती खताच्या रिंग च्या आतील बाजूस दहा ते वीस सेंटीमीटर वर्तुळाकार 25 ते 30 खड्डे घ्यावेत व त्यामध्ये समप्रमाणात द्रावण ओतून खड्डे मातीने भरून घ्यावेत
  • खड्डे शक्यतो टिकावाच्या सहाय्याने काढावेत जेणेकरून या संजीवकाचा अन्नद्रव्य घेणाऱ्या मुळाशी संपर्क येऊन अपेक्षित परिणाम मिळू शकतील

पॅक्लोब्युट्राझोल देताना घ्यावयाची काळजी

  • पॅक्लोब्युट्राझोल देण्यासाठी खड्डे घेताना टिकावाचाच वापर करावा पहरीने खड्डे घेऊ नये पहारीने खड्डे जास्त खोल झाल्यास संजीवकाचा मुळाशी संपर्क न आल्यास अपेक्षित परिणाम दिसत नाही
  • संजीवक दिल्यानंतर झाडाभोवती उगवणाऱ्या तणांचा बंदोबस्त करावा कारण त्यांची मुळे संजीवक शोषून घेतात परिणामी झाडांना संजीवकाची मात्रा कमी पडते
  • पॅक्लोब्युट्राझोल वापरामुळे आंबा उत्पादनात वाढ होते त्याची पूर्तता करण्यासाठी त्या झाडांना शिफारशी पेक्षा दीडपट अधिक मात्रा द्याव्यात

पॅक्लोब्युट्राझोल या संजीवकाचे फायदे

  • पॅक्लोब्युट्राझोल दिलेल्या झाडांना लवकर मोहोर येतो
  • मोहोर मध्ये संयुक्त फुलांचे प्रमाण वाढते त्यामुळे फळधारणा वाढवून अधिक उत्पादन मिळते
  • मोहर लवकर आल्यामुळे आंबा काढण्यासाठी लवकर तयार होतो व बाजारभाव चांगला मिळून आर्थिक फायदा होतो.

 

माहितीचा स्त्रोत :महात्मा फुले कृषि विद्यापीठ, विभागीय विस्तार केंद्र ,कृषि महाविद्यालय ,पुणे  

Leave a Comment

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!