बांबूचे पिक हे हिरवं सोनच असून लागवडीचे महत्व जानुन घ्या

बांबू हा एक गवताचा प्रकार असून सर्वात जलद गतीने वाढण्यासाठी प्रसिद्ध आहे. बांबूच्या 130 पेक्षा जास्त जाती असून त्यापैकी कळक, काटेरी,मानगा, चिवा, चिवारी, मोठा बांबू ,पिवळा बांबू इ कोकणात आढळून येतात.बांबू पिक लागवड मध्ये पर्यावरण,आर्थिक उन्नती,व रोजगाराच्या भरपूर संधी तयार होत आहेत.  ओलितावर बांबूची लागवड करून 70-75 मे टन उत्पादन मिळते .विदर्भात प्रामुख्याने कंटग,माणवेल,व पिवळा बांबू ची लागवड आढळून येते.यापैकी बांबोसा आणि मानवेल बांबू हा जाड व भरीव असतो. मानवेल ही जात जास्त लांब धागा असलेली, जास्त सेल्युलोज असलेली तसेच कीड व रोग प्रतिकारक असलेली जात आहे.पूर्वीं बांबू वन वृक्ष कायद्यामध्ये अंतर्भूत होते सध्या अलीकडे बांबू चा समावेश गवत वर्ग पीक लागवडीत केल्याने च बांबू लागवड आता शेतात किंवा बांधावर करता येईल व तोंडणीला सुद्धा टी.पी लागणार नाही, त्यासंबंधी सरकारी बंधने काढली आहेत आधुनिक पद्धतीने ऊती संवर्धित तंत्र पासून तयार केलेली बांबूची रोपांची लागवड ठिंबक संचावर केल्यास ,वाढ फार झपाट्याने होत असते आणि 3 ते 4 वर्षात कापणीला येतो.

बांबूचे रोप नियोजन

बांबूचे रोप नियोजन प्रामुख्याने बियापासून व कंदापासून करण्यात येते.  बियांपासून रोपे तयार करताना बांबूची रोपे दोन प्रकारांनी तयार करतात. एक गादीवाफ्यात बी पेरून, पॉलिथिन पिशवीत बी लावून.

बांबूची रोपे बियाणे पेरून करताना ती गादीवाफेवर पेरून करावीत. त्यासाठी वाफेची लांबी उताराच्या आडव्या दिशेने ठेवावी. वाफेची रुंदी सर्वसाधारणपणे एक मीटर व लांबी सोयीनुसार दहा मीटर ठेवावी.  गादीवाफेतील अंतर 30 cm ठेवून आडव्या ओळीमध्ये बी पेरणी करावी. . बियांची पेरणी साधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये करावी. तीन ते चार महिन्यांनी रोपे पॉलिथिन पिशवीत लावावीत. तयार केलेली रोपे जून व जुलै महिन्यात लागवडीसाठी वापरता येतात बांबूच्या रोपांची निर्मिती ही बियाणे पॉलिथिन पिशवीत लावून सुद्धा करता येते.

कंदाद्वारे बांबू रोप लागवड

बांबूची लागवड ही साधारणपणे तीन बाय तीन मीटर ते सात बाय सात मीटर अंतरापर्यंत करण्यात येते. बांबूची बेटे हे प्रत्येक वर्षी येणाऱ्या बांबूमुळे पसरत असल्याने त्याचप्रमाणे त्याचा कालावधी 35 ते 40 वर्षाचा असल्याने जास्त अंतरावर बांबू लागवड करणे फायदेशीर असते. यात बांबूची वाढ ही चांगली होते आणि बांबू तोडणीस अडचण येत नाही. सर्वसाधारणपणे पाच बाय पाच मीटर अंतरावर बांबूची लागवड केल्याने एक एक प्रक्षेत्रात 400 बांबूंची रोपे बसतात. 

पाणी व्यवस्थापन

साधारणपणे 750 ते 800 मिलिमीटर पाऊस पडत असलेले ठिकाणी बांबूस पाणी देण्याची गरज भासत नाही. तरीही लागवडीनंतर एक ते दोन वर्ष विशेषता उन्हाळ्यामध्ये रोपांना पाणी देण्याची आवश्यकता पडते. हलक्या व मुरमाड जमिनीत एक आठवड्याच्या अंतराने तर मध्यम व भारी जमिनीमध्ये पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. एक ते दोन वर्षानंतर बांबूस पाणी देण्याची गरज पडत नाही. 

बांबूमधील अंतर पीक

बांबू लागवडीनंतर तीन ते चार वर्षांनी बांबू पक्व होण्यास सुरुवात होते. तेव्हा सुरुवातीच्या दोन ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये दोन ओळींच्या पट्ट्यात जमिनीच्या मगदूरानुसार मटकी मूग पुढील व सोयाबीन सारखे आंतरपीके घेणे हरकत नाही. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळतेच शिवाय जमीन तन विरहित राहण्यास मदत होते. 

बांबू वनशेतीचे फायदे शेतकऱ्यांनी वनशेतीसाठी बांबूची लागवड करणे अनेक दृष्टीने फायद्याचे आहे. बांबू लागवडीमुळे जमिनीची धूप थांबते, पर्यायी जमिनीचा पोत सुधारतो. बांबूपासून अन्न वस्त्र व निवारा या मूलभूत गोष्टी मिळू शकतात. , शिवाय कागद चटाया,, दांड्या, टोपल्या, हॉकी, पत्रे, फर्निचर इत्यादी कितीतरी उत्पादने तयार होतात. त्यासाठी बांबूला सतत मोठ्या प्रमाणावर मागणी असते. बांबू जलद वाढणारा गवताचा प्रकार असून त्याच्या लवचिक व दणकट गुणधर्मामुळे त्याला फार महत्त्व आहे. एकदा बांबू लावल्यानंतर चार-पाच वर्षापासून सतत नियमितपणे बांबूचे उत्पादन मिळत राहते

सध्या भारतात देखील बांबूपासून 1800 प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. ऊस लागवडीमधून किमान हेक्टरी उत्पादन 100 टन व भाव प्रति टन किमान 2500 मिळतो तसेच बांबू लागवडीमधून किमान हेक्टरी उत्पादन 100 टन व भाव प्रति टन किमान 4000 मिळतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत.

Leave a Comment

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!