नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली असून दोन हजारांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी 1 हजार 712 कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
– नमो शेतकरी महा सन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे.
– या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल.
– केंद्र सरकारकडून दर चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
– याप्रमाणेच आता राज्य सरकारही दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करेल.
– यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राचे सहा हजार आणि सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये जमा होतील.
प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेतील पहिला हप्ता पात्र खात्यावर लवकर येणार आहे
त्या नुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता गुरुवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे
यानिमित्त शिर्डी येथे मोठा कार्यक्रम आयोजित केला असून यासाठी देशाचे मा पंतप्रधान नरेंद्र मोदी,मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मा उपमुख्यमंत्री अजित पवार,मा कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि राज्याचे सर्वच मंत्रिमंडळ उपस्थित असणार आहे.
नमो शेतकरी सन्मान योजना हि केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेशीच संलग्न असल्याने या योजनेसाठी वेगळा फॉर्म भरण्याची आवश्यकता शेतकऱ्यांना नाही. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचे वार्षिक ६००० रु.मिळतात अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे देखील ६००० रु.त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाणार आहेत.यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्वच पात्र शेतकऱ्यांना आता वार्षिक १२००० रु.मिळणार आहेत.
महाराष्ट्र राज्य कृषी संवर्धन,मत्स्यविकास विभाग कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या शासन निर्णय मध्ये माहे एप्रिल २०२३ ते माहे जुलै २०२३ साठीचा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता वितरीत केला जाणार आहे.यासाठी राज्य सरकारने आता सर्व तयारी पूर्ण केलेली असून पीएम किसान सन्मान योजनेच्या धरतीवर आता नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे डीबीटी च्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत.
नमो शेतकरी महा सन्मान निधी वितरण कार्यक्रम पाहाण्या साठी खालील लिंक वर क्लिक करून कार्यक्रम पाहू शकता
⇓