“स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना”
सदर योजनेमध्ये 16 बहुवार्षिकीय फळ पिकांच्या कलमे / रोपे लागवडीसाठी अनुदान दिले जाते , ही योजना संपूर्ण महाराष्ट्र (३४ जिल्हे) मध्ये लागू राहील.
लाभार्थी पात्रता:
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडी करता पात्र ठरू शकत नाही असे शेतकरी
- या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल संस्थांतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही.
- शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावे सातबारा असणे आवश्यक आहे जर सातबारा उताऱ्यावर संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमती पत्रक आवश्यक राहील.
- जर सातबारा मध्ये कुळाचे नाव असेल तर त्या कुळांचे संमती पत्रक आवश्यक राहतील.
- ज्या शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून असेल अशा शेतकऱ्यांस प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
लाभ क्षेत्र मर्यादा:
सदर योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी कोकण विभाग किमान 0.10 हेक्टर ते कमाल 10 हेक्टर
तर उर्वरित विभागासाठी किमान 0.20 हेक्टर ते कमाल 6 हेक्टर क्षेत्र मर्यादेत लागवड करता येईल.
समाविष्ट पिके:
या योजनेअंतर्गत पुढील 16 बहुवार्षिकीय फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे
अनुदान मर्यादा:
शेतकऱ्यास तीन टप्प्यांमध्ये अनुदान दिले जाईल.
मंजूर अनुदानापैकी प्रथम वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 टक्के व तिसऱ्या वर्षी 20 टक्के या प्रमाणात अनुदान देय राहील.
अर्जदाराची नोंदणी व आधार प्रमाणीकरण:
इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल व आपल्या आधार क्रमांकाचे प्रामाणिकरण करणे बंधनकारक आहे.
संकेतस्थळ:-
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
सदर वेबसाईट वर अर्ज करताना 7/12, 8 अ नुसार क्षेत्र ,सर्वे नंबर, गावचे नाव इत्यादी सर्व माहिती अचूक भरावी जर माहिती चुकली तर अर्ज रद्द होईल तसेच कलम / रोपे लागवडीचे अंतर हे योग्य भरावे.
संगणकीय सोडत झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोबाईल क्रमांकावर लघु संदेश (SMS) द्वारे निवडीबाबत अवगत केले जाईल.
सोडतीनंतर महाडीबीटीवर पोर्टलवर अपलोड करायची कागदपत्रे:
- 7/12 उतारा
- 8 अ उतारा
- सामायिक क्षेत्र असल्यास लाभार्थी शेतकऱ्यांनी इतर खातेदारांची सहमती पत्र सादर करणे बंधनकारक आहे
- आधार कार्ड
- बँक खाते क्रमांक
- लिंबूवर्गीय फळ पिकांच्या साठी असणारे माती परीक्षण अहवाल अपलोड करावा (कागदी लिंबू ,संत्रा, मोसंबी)
कलमे /रोपे खरेदी व लागवड करणे:
अर्जदार शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी कलमे/ रोपांची निवड स्वतः करायचे असून खाली दिलेल्या रोपवाटिकांमधून रोपे घ्यावीत.
- कृषी विभागाच्या रोपवाटिका
- कृषी विद्यापीठांच्या रोपवाटिका
- राष्ट्रीय बागवानी मंडळामार्फत मानांकित खाजगी रोपवाटिका
- कृषी विभागाच्या परवानाधारक खाजगी रोपवाटिका
ठिबक सिंचन:
सदर योजनेमध्ये जर शेतकरी बांधवांनी फळबाग लागवड केली असल्यास कोकण विभाग वगळता इतर विभागांसाठी ठिबक सिंचन बसवणे अनिवार्य आहे
लाभार्थी शेतकऱ्यांची जबाबदारी:
- सदर योजनेमध्ये सहभाग घेण्याकरता इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login ऑनलाईन अर्ज सादर करावा.
- पूर्वसंमती नंतर 75 दिवसांमध्ये सर्व बाबींसह फळबागेची लागवड करावी.
- शासकीय किंवा परवानाधारक रोपवाटिकेमधूनच कलमे लागवड करावी.
- शासनाने निश्चित केलेले फळपीक व लागवडीचे अंतर यानुसारच अनुदान दिले जाईल.
- ठिबक सिंचन संच सात वर्षांपर्यंत त्याच शेतात कायम ठेवणे अनिवार्य आहे.
- लिंबूवर्गीकरण रोपे लागवडीसाठी माती परीक्षण अनिवार्य राहील माती परीक्षणाचा खर्च शेतकऱ्यांनी स्वतः करावा लागेल.
- लागवड केलेली फळझाडे पहिल्या वर्षी 80 टक्के व दुसऱ्या वर्षी किमान 90 टक्के जगवणे आवश्यक राहील.
- सक्षम प्राधिकार्याची तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्यानंतरच लाभार्थ्याने फळबाग लागवड करावी.
“पूर्व संमती न घेता शेतकऱ्याने फळबाग लागवड केल्यास किंवा ठिबक सिंचन उभारणी केल्यास अशा बाबतीत शेतकऱ्यास अनुदान देण्याची जबाबदारी शासनाची राहणार नाही”