मोबाइल वर डाउनलोड करा “Digitally Signed 7/12”

“Online Digital 7/12”

आता सातबारा उतारा काढण्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही तसेच संगणकाचीही गरज नाही तुम्ही मोबाईलवरही सातबारा उतारा मिळवु  शकता आणि हा डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा घरबसल्या काढून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वापरताही येतो.

डिजिटल सातबारा कसा काढणार ?

सातबारा काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर वर ही  https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr  लिंक सर्च करावी लागेल. किंवा या लिंक वर क्लिक करा 

त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल. 

 

जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता. जर आपण या आधी वेबसाईटवर नोंदणी केली नसेल तर नोंदणी करण्यासाठी New User Registration वर क्लिक करून नोंदणी करा. 

पण, जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन सातबारा काढण्यासाठी या वेब साइटवर आला असाल, तर मोबाईल क्रमांक वापरूनही तुम्हाला सातबारा काढता येईल. त्यासाठी OTP Based Login वर क्लिक करून आपला मोबाइल नंबर एंटर करून मोबाइल वर आलेला one-time password (OTP) टाकून आपला मोबाइल क्रमांक Verify करा

त्या नंतर तुमच्यासमोर आपला सातबारा नावानं एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय येतील 

आता आपण नवीन रेजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे आपल्या खात्यात काहीही  बॅलन्स नसतो. त्यामुळे सगळ्यात आधी खात्यात पैसे जमा करणं गरजेचे  असते  ते कसे करायचे तर खाली असलेल्या रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.त्यानंतर हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा यूपीआई पेमेंट ऐप असेल तर त्याद्वारे जमा करता येऊ शकतात. तसे वेगवेगळे पर्याय इथे दिलेले आहेत.त्यानंतर डिजिटल सातबाऱ्याच्या फॉर्मवर परत गेले, तर तिथं तुम्हाला तुम्ही रीचार्ज केलेले तुमच्या खात्यात जमा असल्याचं दिसेल.

प्रतेक 7/12 , 8 अ साठी रुपये 15 फी आहे  ती उपलब्ध बॅलेन्स मधून कापले जातील. 

 

आता डिजिटल सहीचा सातबारा मिळवण्यासाठी तुम्हाला फॉर्मवर वर दिलेली माहिती भरायची आहे.

यात जिल्ह्याचं, तालुक्याचं आणि गावाचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर अचूक सर्व्हे किंवा गट नंबर टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी डाऊनलोड म्हणायचं आहे 

त्यानंतर डाऊनलोड झालेला सातबारा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.

यावर स्पष्ट लिहिलेलं असतं की, हा सातबारा डिजटल स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज नाही.

आता हा 7/12 कोणत्याही शासकीय कामासाठी वापरता येईल

Leave a Comment

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!