प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ( PMFME )
आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत कृषी विभागाची एक महत्त्वाकांशी योजना
केंद्र शासन सहाय्यित
समाविष्ट जिल्हे:- महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्हे ( मुंबई शहर व मुंबई उपनगर समाविष्ट)
- सध्या कार्यरत असलेल्या व नवीन सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि नवे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करणे
- सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षांसाठी संपूर्ण राज्यभर लागू आहे.
- सर्व प्रकारच्या नवीन व कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँकेच्या कर्जाशी निगडित असा लाभ मिळतो.
- आजारी सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगही बँक कर्ज उपलब्ध असल्यास पात्र ठरतात
- पारंपारिक स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन
- वैयक्तिक लाभार्थी—प्रगतशील शेतकरी , नव उद्योजक , बेरोजगार युवक , महिला वैयक्तिक मालकी/भागीदारी ,शेतकरी उत्पादक संस्था (FPO), स्वयंसहायता गट (SHG) , गैर सहकारी संस्था (NGO) ,सहकारी संस्था, खाजगी कंपनी इत्यादी.
- गट लाभार्थी /CIF – शेतकरी उत्पादक संस्था (FPO) / शेतकरी उत्पादक कंपनी (FPC), सहकारी संस्था , स्वयंसहायता गट ( (SHG)
- ODOP किंवा NON ODPO साठीचे प्रस्ताव सहाय्यासाठी पात्र तथापि ODOP प्रस्तावांना प्राधान्य.
- या योजनेमध्ये नाशवंत फळ पिके, कोरडवाहू पिके, भाजीपाला, अन्नधान्य, तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, मसाला पिके, गुळ इत्यादींवर आधारित उत्पादने, दूध व पशु उत्पादने, सागरी उत्पादने, मांस उत्पादने , वन उत्पादने इत्यादी उत्पादनांचा समावेश.
- योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन संगणकासोबतच मोबाईल वरून देखील अर्ज सादर करता येईल.
- एकाच लाभार्थ्याला योजनेअंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल.
योजनेअंतर्गत घटक लाभार्थी आणि आर्थिक मापदंड
१ ) प्रशिक्षण- * योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीने कर्ज मंजुरीसाठी बँकेकडे शिफारस केलेले वैयक्तिक लाभार्थी (३ दिवस प्रशिक्षण)
* योजनेअंतर्गत बीज भांडवल लाभ मिळालेले स्वयंसहायता गटाचे लाभार्थी ( १ दिवस प्रशिक्षण)
* प्रशिक्षणाचे अनुदान शंभर टक्के
२ ) बीज भांडवल- ग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयंसहायता गटातील सदस्य गट यांना लहान मशनरी खरेदी करण्यासाठी व खेळते भांडवल यासाठी प्रति सदस्य कमाल रुपये ४०,०००/- व प्रति स्वयंसहायता गट कमाल रक्कम ४,००,०००/-
३ ) वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग- वैयक्तिक मालकी / भागीदारी ,शेतकरी उत्पादक संस्था (FPO), अशासकीय संस्था सहकारी संस्था (NGO), खाजगी कंपनी , स्वयंसाहायता गट (SHG) यांना प्रकल्प किमतीच्या 35 टक्के , जास्तीत जास्त १० लाख रुपये
४ ) सूक्ष्म अन्नप्रक्रिया गट उद्योगांना लाभ (सामायिक पायाभूत सुविधा)—शेतकरी उत्पादक संस्था (FPO)/शेतकरी उत्पादक कंपनी (FPC), सहकारी संस्था , स्वयं सहाय्यक गट (SHG), आणि त्यांचे फेडरेशन यांना प्रकल्प किमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त तीन कोटी पर्यंत मदत
५ ) मार्केटिंग व ब्रँडिंग – शेतकरी उत्पादक संस्था (FPO)/शेतकरी उत्पादक कंपनी (FPC), स्वयंसहायता गट(SHG) यांचे समूह अथवा SPV यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या 50% कमाल आर्थिक मर्यादा केंद्रशासमार्फत नंतर विहित करण्यात येईल
६ ) सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना लाभ (इनक्युबॅशन केंद्र /मूल्यसाखळी) – शेतकरी उत्पादक संस्था (FPO)/शेतकरी उत्पादक कंपनी (FPC), सहकारी संस्था , स्वयं सहाय्यक गट (SHG) यांना त्यांच्या प्रकल्प किमतीच्या 35 टक्के ते जास्तीत जास्त ३ कोटी.
सर्व सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना लाभ तथापि ODOP ना प्राधान्य
फळे उत्पादने- पालघर ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग, धुळे ,जळगाव ,सांगली ,जालना ,बीड, अमरावती ,बुलढाणा.
भाजीपाला उत्पादने- नाशिक, पुणे, लातूर.
मासे व सागरी उत्पादने– मुंबई शहर ,मुंबई उपनगर, रायगड.
पौष्टिक तृणधान्य उत्पादने– ठाणे, नंदुरबार, सोलापूर.
तृणधान्य उत्पादने– छत्रपती संभाजीनगर, भंडारा ,गोंदिया ,चंद्रपूर.
कडधान्य उत्पादने– धाराशिव, अकोला.
तेलबिया उत्पादने- वाशिम.
मसाला उत्पादने- नांदेड ,हिंगोली ,यवतमाळ, वर्धा.
ऊस गुळ उत्पादने कोल्हापूर, सातारा, परभणी.
दूध व दुग्धजन्य पदार्थ- अहमदनगर
किरकोळ वन उत्पादने- गडचिरोली
लाभार्थी निवडीचे निकष
१ ) वैयक्तिक लाभार्थी निवड निकष
- अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार असावा.
- अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष व एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल.
- सदर उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करून देण्याची तयारी असावी.
- प्रकल्प किमतीच्या किमान १०% लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक कर्ज घेण्याची तयारी असावी.
२ ) गट लाभार्थी निवडीचे निकष
- सर्व अन्नप्रक्रिया उद्योगांच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत शेतकरी उत्पादक गट / कंपनी ,स्वयंसहायता गट ,उत्पादक सहकारी संस्थांना लाभ देय असेल
- प्रकल्प किमतीच्या किमान १०% लाभार्थी हिस्सा व उर्वरित बँक कर्ज घेण्याची तयारी असावी
अर्ज करण्यासाठीचे संकेत स्थळ :- https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/Login
https://krishi.maharashtra.gov.in/
अर्ज करण्याची पद्धत:-