गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना
शेती व्यवसाय करत असताना होणारे विविध अपघात – वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात झाल्यास व त्या अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते.
शेतकऱ्यास अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते.
राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला असून दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई,वडिल, लाभार्थी चे पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकुण दोन जणांना लाभ घेता येईल.
शेतकऱ्यांनी अर्जाच्या नमुन्यासाठी आपल्या नजिकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा
या योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी कृषी विभागाकडून सहाय्य करण्यात येते
सदरचा दावा शक्यतो ४५ दिवस कालावधीत नोंदवावा
लाभ केव्हा मिळेल:
- रस्ता किंवा रेल्वे अपघात,
- पाण्यात बुडून मृत्यू,
- जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा,
- विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात,
- वीज पडून मृत्यू,
- खून,
- सर्पदंश व विंचुदंश,
- नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या,
- हिस्त्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामळे जखमी होणे किंवा मृत्यू,
- दंगल.
- नैसर्गिक मृत्यू,
- विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व,
- आत्महत्येचा प्रयत्न,
- आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे,
- गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात,
- अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात,
- भ्रमिष्टपणा, बाळंतपणातील मृत्यू,
- शरीरांतर्गत रक्तस्त्राव,
- मोटार शर्यतीतील अपघात, बैल गाडा शर्यती.
- युद्ध, सैन्यातील नोकरी,
- जवळच्या लाभधारकाकडून खून
- विहित नामुन्यातील अर्ज
- ७/१२
- ८ अ
- ६ क
- ६ ड
- मृत्यू दाखला
- PM (postmortem) report
- प्रथम माहिती अहवाल
- वयाचा दाखला
- घटनास्थळ पंचनामा
- ड्रायविंग लाईसण (आवश्यकते नुसार)
अ क्र | अपघाताची बाब | नुकसान भरपाई |
१ | अपघाती मृत्यू | रु २,००,०००/- |
२ | आपघाता मुळे २ डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी | रु २,००,०००/- |
३ | आपघाता मुळे १ डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकमी | रु १,००,०००/- |
मोलाची माहिती दिली धन्यवाद